नवी दिल्ली : राज्यातील ४८ खासदारापैकी काॅंग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपुरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची तब्येत बिघडली आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अचानक तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्यावर आता दिल्लीत उपचार सुरू आहेत.
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
रविवारी खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुर येथील अरिहंत रूग्णालयातून विशेष एअर अॅम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी वेदांता रूग्णालयात हलवण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी त्यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले होते. भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, खासदार धानोरकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाही. त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले आहे. त्यांना दिल्ली येथील वेदांता रूग्णालयात कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर साहेब यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाज माध्यमावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. मा. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करूया असं खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
काल शनिवार दिनांक २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परतू आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे. असंही सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं