मुंबई : मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात मागे चांगलीच खडाजंगी उडाली होती. यातच कॉंग्रेसचे विधानसभेचे गटनेते बाळासाहेब थोरात यांना देखील गटनेते पदावर राहण्यास रस नसल्याने आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील कॉंग्रेस मध्ये अनेक बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांचा समावेश कर्नाटक मंत्रिमंडळात झाल्याने त्यांच्या जागी नवा प्रभारी देण्यात येणार आहे. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशा हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”
दरम्यान, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कॉंग्रेसच्या काही नेत्यांना पाठीशी धरून दिल्लीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवण्याची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. तर विधानसभेत गटनेते पदावर राहण्यास बाळासाहेब थोरात यांना रस नसल्याचं समजत आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत