मुंबई : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं स्वारस्थ देवेंद्र फडणवीस यांनी केले. याआधीही एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं स्वारस्थ देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्राने किती जबाबदाऱ्या दिल्या आहेत. परंतु त्यांनी काल फुटलेल्या गटातील मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत होते. देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे. त्यांची मला दया येते, त्यांची कीव करावीशी वाटते. अशा पद्धतीची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यांना लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढावं. अशी देवांकडे प्रार्थना करतो. असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला
दरम्यान, संजय राऊतांच्या टिकेला भाजपचे पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अख्खा महाराष्ट्राला शिल्लक सेनेची कीव येतेय. कारण अख्खा गट संपत आला, पण माज काही संपेना. स्वत: वर आलेल्या संकटाची तीव्रता आणि आपली उंची, पात्रता यानुसारच टिका करा. आमचे नेते देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायला खंबीर आहे, तुमच्या नेत्यासारखे रडगाणे गाणारे नाही. असा टोलाही त्यांनी मुळीक यांना लगावला.
अख्खा महाराष्ट्राला शिल्लक सेनेची कीव येतेय. कारण अख्खा गट संपत आला, पण ‘माज’ काही संपेना !
स्वतःवर आलेल्या संटकाची तीव्रता तपासा आणि आपली उंची, पात्रता यानुसारच टीका करा !
आमचे नेते मा. देवेंद्रजी कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायला खंबीर आहे, तुमच्या नेत्यासारखे ‘रडगाणे’… pic.twitter.com/75IQzafk7b
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) May 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका