पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे वारंवार उमेदवार पराभूत होत आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. तर काॅंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये या जागेवरून दावे ठोकले जात आहेत. तर काॅंग्रेसकडून आता या निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार आहे. ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात आमदार रविंद्र धंगेकरांना काॅंग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांना तयारीचे आदेशही दिले आहे. त्यामुळे एकिकडे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असतानाच दुसरीकडे मात्र काॅंग्रेसने उमेदवार निश्चित केल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास