पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे वारंवार उमेदवार पराभूत होत आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. तर काॅंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे. त्यावर आता रविंद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेस पक्षातून शहाराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेच आहेत. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी धंगेकर यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची बातमी समोर आली आहे. कारण यापुर्वी त्यांनी पुण्याच्या दोन लोकसभेच्या निवडणुक लढवल्या आहेत. त्याचा त्यांना अनुभव आहे. त्या निवडणुकात देखील त्यांनी चांगली मत घेतली होती आणि आता तर वारं बदललं आहे.
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक
मी अजून आमदार आहे. पक्षात छोटा कार्यकर्ता आहे. मोहन दादांच्या वयात जायला मला अजून दहा वर्ष बाकी आहेत, त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ही निवडणुक लढायला इच्छुक नाही. नंतर पक्ष कधी संधी देईल तेव्हा मी आहेच. असं धंगेकरांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
हेही वाचा…“केवळ एक रूपयात पीक विमा..!” शिंदे सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील ‘विरोधी पक्षनेते’ पद जाणार, शिंदे गट अॅक्शन मोडवर
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक