मुंबई : गेल्या काही दिवसापासून देशातील कुस्तीपट्टूंनी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनचा पवित्रा हाती घेतला आहे. कुस्तीपट्टूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरून बडतर्फ करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यावर आता कुस्तीपट्टू आपले मेडल्स गंगेत वाहणार आहेत. या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा
दरम्यान, अयोध्या दौऱ्याच्या वेळी बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि बृजभुषण सिंह चर्चेत आलं आहे.
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh
— Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन”, बृजभुषण शरण सिंह
हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा
हेही वाचा…गौतमीच्या यशाने लोकांना… “पाटलां”च्या वादात अमोल कोल्हेंची उडी, टीकाकारांना झापलं
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल