पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठकी घेतल्या जात आहेत. यातच सातारा, माढा, कोल्हापुर, हातकणंगले, अहमदनगर, परभणी, बीड, नाशिक आणि दिडोंरी आणि धाराशीव या मतदारसंघाची बैठक पार पडली. मात्र याबैठकीला माढ्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गैरहजर असल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”
मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या पातळीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका घेत असताना माढा लोकसभा आढावा बैठकीस पक्षाचे माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे दोघेही गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष बळीराम साठे यांनीही या आढावा बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल
एकेकाळी खुद्द शरद पवारांनी देखील या मतदारसंघातून निवडूक लढविली होती. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचा आहे. त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील नेते गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. यातच मागच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळक यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे या मतदार संघातून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याकडेही लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, भाजपच्या ‘या’ खासदाराचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची राज ठाकरेंची मोदींकडे मागणी.. थेट पत्रच लिहिलं
हेही वाचा…“माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन”, बृजभुषण शरण सिंह
हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा
हेही वाचा…गौतमीच्या यशाने लोकांना… “पाटलां”च्या वादात अमोल कोल्हेंची उडी, टीकाकारांना झापलं