बीड : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भाजपवर असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मी भाजपची आहे. परंतु भाजप पक्ष माझा नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
हेही वाचा…बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची राज ठाकरेंची मोदींकडे मागणी.. थेट पत्रच लिहिलं
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीनिमित्ताने राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भाजपची आहे. पण पक्ष माझा नाही. भाजप पक्ष खुप मोठा आहे. याशिवाय आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन उस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन”, बृजभुषण शरण सिंह
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. पंकजा मुंडे काय बोलल्या? हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक मुद्दा आहे. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आल्या तर स्वागत करू. तसेच त्यांच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंज मुंडे हे चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. पण, तशा पद्धातीचं माझ्या कानावर काही आलेलं नाही. असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा
दरम्यान, भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
READ ALSO :
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ
हेही वाचा…कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, भाजपच्या ‘या’ खासदाराचा सरकारला घरचा आहेर