पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आता आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदार संघाबाबत संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा केली जात आहे. यातच पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र त्यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. पवार घराण्यातील सदस्यांचा राजकारणातील हा पहिलाच पराभव असल्याने याचा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला. निवडणुकीच्या निकालानंतर मग पार्थ पवार यांच्यासाठी मग राष्ट्रवादी पोषक मतदार संघ शोधू लागली आहे. त्यामुळे या मतदार संघातून पार्थ पवार यांना पुन्हा उमेदवारी देणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ
आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थ पवार यांच्यासोबत आमदार आदिती तटकरे यांच्याही नावाचा विचार केला जात आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा तसा जनसमुह सध्या निर्माण न झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा ठरू शकते. त्याचबरोबर याच मतदारसंघातील कर्जत, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात तटकरे कुटुंबीयांची चांगली ताकद बाळगून आहे. याचबरोबर शेजारच्याच रायगडमधून वडील सुनील तटकरे खाससदार असल्याने आदिती तटकरेंना बळ मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी