मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परदेशात असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आता चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. बंडदाराआड दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांचं निमंत्रण देण्यासाठी पवार वर्षा बंगल्यावर गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना जेव्हा-जेव्हा राज्याच्या प्रमुखांच्या कानावर महत्वाचे विषय मांडायचे असतात, तेव्हा- तेव्हा ते स्वत: मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटी घेत असतात.
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
आताही साखर कारखानदारीच्या अनुषंगाने शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. कृषी सहकार विषचाचे प्रश्न आणि त्यासंदर्भातल्या अडचणी पवार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू शकतात. असंही बोललं जात होतं. सोबतच उद्धव ठाकरे हे परदेशात असताना शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. असल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. किंबहुना त्याचमुळे भेटीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. इतकेच नव्हते आणखी एक अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर फारसे टीका करताना दिसत नाही.
हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ
दरम्यान, शरद पवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गेले आहेत, एकनाथ शिंदेंडे गेलेले नाहीत. काही प्रश्न घेऊन राजकीय पक्षांची लोकं भेटत असतात. जिल्हा नियोजनाच्या बैठकीतही पवार साहेब गेले होते, ही भेट राजकीय आहे का प्रशासकीय आहे? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. अस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या