पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आता लोकसभा निवडणुक मतदारसंघ आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा सुरू आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. खासदार अमोल कोल्हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असतांना राष्ट्रवादीने इतर उमेदवारांच्या नावांची चर्चा केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
यातच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आल्याने एकच चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा पत्ता कट होणार का ? अन् त्याजागी कुणाला उमेदवारी मिळणार? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. यावर अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी लोकसभेत खुप चांगले काम केले आहे. त्याव्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरूर मतदारसंघात आहेत. ज्यांचं तिथं चांगलं काम आहे. असं सुचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघावर राष्ट्रवादीने कडवी नजर ठेवली आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ तसेच अनेक बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची रणनीती आखण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून दिलीप वळसे पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी तयार केले जात असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
अमोल कोल्हे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन वेळचे खासदार राहिलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या लोकसभा मतदार संघासाठी सुरूवातीला माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी त्यावेळची निवडणुक लढण्यास नकार दिल्याने कोल्हेंना उमेदवारी मिळाली. यातच आता अमोल कोल्हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देणार का ? की कोल्हेंच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला उमेदवारी मिळणार? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर