मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री खासदार उपस्थित आहेत. यातच खासदार उदयन राजे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुजेला बसल्याने राष्ट्रवादीने यावरून खोचक टिका केली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या..
राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज किल्ले रायगडावर तिथीनूसार महाराष्ट्र सरकार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतांना एकीकडे मुख्यमंत्री पुजेला खाली बसलेत मात्र दुसरीकडे छत्रपती घराण्याचे वंशज. खासदार उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं आहे. एक शिवअनुयायी म्हणून सरकारने केलेल्या दुष्कृत्याचा जाहीर निषेध असं अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? असा सवालही त्यांनी केला आहे. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. तते रयतेच स्वराज्य होतं. तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
दरम्यान, ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यानाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय. असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज किल्ले रायगडावर तिथीनुसार महाराष्ट्र सरकार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतांना एकीकडे मुख्यमंत्री पुजेला खाली बसलेत मात्र दुसरीकडे छत्रपती घराण्याचे वंशज खा.उदयनराजेंना प्रेक्षक म्हणुन उभं केलंय. एक शिवअनुयायी म्हणुन सरकारने केलेल्या दुष्कृत्याचा जाहीर निषेध.#shame pic.twitter.com/GM0HBoHpOG
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023
छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल.@mieknathshinde@Dev_Fadnavis
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023
ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यानाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ
हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय
हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ?