नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपट्टूंनी आंदोलन छेडले आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपट्टूंनी लैगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणावरून आता देशात भाजप आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यावरून महाराष्ट्र काॅंग्रेसने या प्रकरणावरून जहरी टिका केली आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करण्याच्या नीचपणा म्हणावं तरी काय? भाजप नेत्यांना मुली उपभोगाचे साधन वाटतात का? फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का? बेटी बचाओ चा नारा ते यासाठीच देतात का? एवढ्या महिला खेळाडूंनी तक्रार करूनही बृजभूषण सिंहवर कारवाई न करणारे, महिला खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर बृजभूषण सिंहवर गुन्हा दाखल करणारे, गुन्हा दाखल झाल्यावर देखील बृजभूषण सिंहला अटक न करणाऱ्या मोदी सरकारमध्ये जरा तरी नैतिकता शिल्लक आहे का ? असा सवालही काॅंग्रेसने केला आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर
दरम्यान, कुस्तीपट्ट्यांच्या समर्थनार्थ राज्यातील एव्हाना देशातील अनेक राजकीय नेत्यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी देखील बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणाबाबत मोदींनी लक्ष घालावे, असं म्हणत त्यांनी थेट मोदींना पत्र लिहिले आहे.
दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करण्याच्या नीचपणाला म्हणावं तरी काय?
भाजप नेत्यांना मुली उपभोगाचे साधन वाटतात का? फक्त शाररीक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का? ‘बेटी बचाओ’चा नारा… pic.twitter.com/3PHsJzj6Zc
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं”, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज ठाकरे भावूक
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत
हेही वाचा…शिवराज्याभिषेक सोहळा..! मुख्यमंत्री पुजेला खाली बसले, मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं, राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ
हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय