मुंबई : ओडीशा राज्यात कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या रेल्वे अपघातात आतापर्यंत जवळपास २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० पेक्षा अधिक जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर देशभरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहेत. या अपघातावरून काॅंग्रेसने रेल्वे मंत्री अश्विनी वैश्णव यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
हेही वाचा…ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?
काही दिवसांपुर्वी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दावा केला होती की आता रेल्वे दुर्घटना घटना होणार नाहीत आणि कवच दोन रेल्वेना आपोआपच थांबवले, पण इथे कवच सिस्टमने काम का केले का नाही केले? का एवढ्या लोकांचा बळी गेला? का एवढे लोक जखमी झाले? या प्रश्नांची उत्तरं मोदी सरकार कधी देणार ? असा सवालही काॅंग्रेसने केला आहे.
हेही वाचा…“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ?
दरम्यान कोरोमंडल एक्सप्रेसची झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून कित्येक निष्पापांचे प्राण यात गेले. सरकारने तातडीन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि मृत्यांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त भरपाई द्यावी. जखमींच्या उपाचारा पुर्ण खर्च उचालण्याबरोबरच त्यांनाही भरपाई दिली जावी. असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, ओडिशामधील बालेश्वरजवळ शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक आहे. या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw यांनी दावा केला होता की आता रेल्वे दुर्घटना घटना होणार नाहीत आणि ‘कवच’ दोन रेल्वेना आपोआपच थांबवेल.
पण इथे कवच सिस्टमने काम का नाही केले?
का एवढ्या लोकांचा बळी गेला?
का एवढे लोक जखमी झाले?या प्रश्नांची उत्तरं मोदी सरकार कधी… pic.twitter.com/BP0FSSvaAN
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा