बीड : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत चांगल्याच चर्चेत आल्या. पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा त्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली. यावर अनेक राजकीय नेत्यांनी टिप्पणी केली. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
गोपीनाथ मुंडे ज्यावेळी भाजपमध्ये होते. त्यावेळी भाजपचं नेतृत्व वेगळं होतं. आता सर्व बदललं आहे. पंकजा मुंडे जी माझी बहिण आहे. तिने भाजपच्या या महासागरात बोलतांना आपलं पक्षात नुकसान तर होणार नाही ना. याची काळजी घेतली पाहिजे. मुंडे साहेबांनी भाजपला भरपुर दिलं. तसं भाजपने देखील मुंडे साहेबांना खुप काही दिलं. पंकजा ताईंना देखील भाजपने खुप काही दिलं. अस धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
परिस्थिती जेव्हा संघर्षाची असते, त्याकाळात स्वत:ला आपण संभाळलं पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडेंची पुण्याई त्यांच्यापाठीमागे आहे. तसेच मुंडेंना मानणारा मोठा वर्ग त्याठिकाणी आहे. परंतु पंकजा ताईंच्या मनातून उद्विग्नता निर्माण होणं चागलं नाही. असंही धनंजय मुंडे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल