मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहिले आहेत. यातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारले असता राऊतांनी आक्षेपार्ह कृती केली. त्यानंतर त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षांकडून टिका करण्यात आली. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं. त्यानंतर राऊतांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी देखील पलटवार केला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
त्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. धरणात मुतण्यापेक्षा थंकणं चांगलं. प्रत्येकानं संयम राखला पाहिजे. परंतु ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगून सुद्धा जमीनीवर आहोत. आम्ही इकडे तिकडे पळालो नाही. आमच्यावर संकट येताहेत. भाजपसोबत सुत जुळवण्याचा आमचा प्रयत्न नाही. तसेच या देशातील १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नाही तसचं ही संस्कृतीही नाही. असं अजित पवार यांनी संजय राऊतांच्या टिकेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक