मुंबई : राज्यात किंवा देशात ओबीसी हा मोठा समाज घटक आहे. त्यामुळे त्यांना टाळून कोणालाही राजकारण, समाजकारण करता येणार नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी समाजाच्या हिताचेच राजकारण नेहमी केले. मात्र भाजप सरकारकडून ओबीसी नेतृत्व दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वत: ला ओबीसी नेते म्हणवतात, पण सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्व नाही. असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, काॅंग्रेसचा पंतप्रधान कोण आहे. ? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचा २२ वर्षापासून अध्यक्ष कोण आहे? मराठा-शरद पवार, हे आम्हाला अक्कल शिकवणार का ? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत. असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?