पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाहीतर कानाखाली देऊन पद काढलं जाईल. असा इशाराही अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला पदं हे काम करण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही पक्षात राहून काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन. असा इशारा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला आहे. महाविकास आघाडीची येत्या काही दिवसात जाहीर सभा होत आहे. त्यासभेसाठी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुचना केल्या. पुण्यात आपली ताकद ही वेगवेगळ्या मतदारसंघात अजूनही आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात आपला प्रतिनिधी आहे. त्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लोकं सभेला आली पाहिजेत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?
दरम्यान, मुळशीच्या लोकांना पदं दिली नाहीत. त्यामुळे तुमच्यात भांडायचं नाही. नाही तर एकएकाच्या कानाखाली आवाज काढीन. यामधून बदनामी तुमची नाही तर आमची होते. एकदा पद घेतलं की तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी होतात. त्यामुळे तुम्ही कामं केली पाहिजेत. असंही अजित पवार यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार