मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार आणि शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मागील काही दिवसापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार का ? याबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत.
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही भेट घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
राज्यात आगामी सर्व निवडणुकांमध्ये लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठई आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी. विकासाठी घोडदौड ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असंही शिंदेंनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल