पुणे । विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याची तयारी केली आहे. पवारांना टक्कर देणारा आणि शहरी व ग्रामीण जिल्ह्यात लोकाश्रय असलेला तगडा नेता म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल
भाजपा-शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र, अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ‘डिसिझन मेकर’ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
कर्नाटक निवडणुकांचे निकाल आणि भाजपाविरोधातील वाढते जनमत पाहता स्थानिक नेत्यांना ताकद देण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. ज्याद्वारे लोकाश्रय असलेल्या नेत्याद्वारे आगामी निवडणुकीत भाजपाचे ‘कमळ’ फुलवणे सोपे होईल. त्याकरिता पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला आव्हान देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात भाजपाने सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील निर्णयाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. कसबा निवडणुकीत भाजपाला बालेकिल्ल्यात पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झाली, त्याचा फायदा भाजपाला झाला. अन्यथा भाजपाचा उमेदवार पराभवाच्या छायेत होता, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, स्थानिक पातळीवर निर्णय स्वातंत्र्य आणि जनाधार असलेल्या नेत्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे, असे सूचक संदेश भाजपाच्या ‘थिंक टँक’ने दिला आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी देवून पुणे जिल्ह्यातील उत्तर भाग काबिज करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. अर्थात, पुणे जिल्ह्याचे दक्षिण व उत्तर असे विभाजन आणि नवीन शिवनेरी जिल्ह्याची मागणी करुन त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या भूमिकेमुळे यावर बहुतांशी शिक्कामोर्तब झाले आहे.
शिरुर लोकसभा, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघांचा विचार केला असता केवळ चिंचवड आणि भोसरीमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. बाकी सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. आमदार लांडगे यांना भाजपाने ताकद दिल्यास या सर्व मतदार संघात भाजपाच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, या सर्वच मतदार संघात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार स्वत: लक्ष घालतात. त्यामुळे पवारांना तोडीस तोड स्थानिक नेता तयार करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्याअनुशंगाने भाजपाकडे लांडगे हा सक्षम पर्याय होवू शकतात, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
आमदार लांडगे यांची बलस्थाने…
– भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी जनाधार असलेला नेता.
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळख.
– २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विजयात सिंहाचा वाटा.
– बैलगाडा शर्यतीच्या यशस्वी न्यायालयीन लढ्यामुळे ग्रामीण भागात मोठी ’क्रेझ’.
– विकासकामांच्या बाबतीत राष्ट्रवादीसह अजित पवारांची स्पर्धा करण्याची क्षमता.
– प्रखर हिंदूत्ववादी भूमिकेमुळे भाजपा परिवारातील लोकांची विशेष मर्जी.
– ‘भोसरी व्हीजन- २०२०’मधील प्रकल्पांमुळे विकासाभिमूख चेहरा.
– इंद्रायणी थडी, एक हात मदतीचा अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्यांची मोठी पसंती.
– सर्वसमावेशक राजकीय कार्यपद्धतीमुळे उद्योग व कामगार क्षेत्रात मोठा जनसंपर्क.
READ ALSO :
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?