सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करतांना दिसत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा त्यांनी माकड म्हणून उल्लेख केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून यावर काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल इतका कळवळा होता तर शरद पवार चौंडी येथे का आले नाही.? शरद पवार राज्यात चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात देखील त्यांनी केंद्रीय मंत्री पद भुषवलंय.त्यावेळी त्यांना चौंडी आठवली नाही का ? असा खोचक सवालही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना केला आहे.
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी टीका केली. रोहित पवार अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी प्रत्येक वर्षाला चार बोकड कापतात. पण त्यांच्या दावणीला किती कोंबडं असतात, हे तुला माहिती नाही का माकडा? असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं