नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ साली रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजट बांधली आहे. विरोधी पक्षातील राजकीय पक्षातील नेत्यांनी आता एकमेकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यातच विरोधी पक्षातील नेत्यांची १२ जून रोजी पाटणा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु काॅंग्रेसच्या काही नेत्यांच्या कामामुळे ही बैठक तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले
काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वतीने सांगण्यात आले होते की, १२ तारखेला होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहू शकत नाहीत. काॅंग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला असून, राहूल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी २० जूननंतर भारतात परतणार आहेत. काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत नियमित तपासणीसाठी विदेशात गेलेल्या आहेत.
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
राहुल गांधी हे त्यांचा अधिकृत कार्यक्रम संपल्यानंतर सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि सीताराम येचूरी यांनीही व्यस्ततेमुळे बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.यातच आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. हीच बैठक सिमला येथे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीसाठी फक्त मुख्य नेत्यांनाच परवानगी असणार असल्याचीही माहिती नितीश कुमार यांनी फोनवरून ठाकरेंना दिली आहे.
READ ALSO :
Vकेंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,
हेही वाचा…“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला