नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करतांना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून अनेक नव्या मंत्र्यांना संधी तर जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा भाजपसोबत गेल्याने त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. भाजप प्रणित एनडीएमध्ये नवे घटक पक्ष सामील होण्याचीही चर्चा आहे. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आढावा घेत आहेत. सरकारला नऊ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल ३० जूनपर्यंत विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे विस्तार जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका
सध्या मंत्रिमंडळात सध्या ७६ मंत्री असून त्यात २९ कॅबिनेट मंत्री, ४५ राज्यमंत्री आहेत. दोन राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्री व काही राज्यमंत्र्यांना दूर केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या तुलनेत मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या १५ टक्के असू शकते.
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे १३ खासदार सोबत आले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील दोन ते तीन खासदारांना या कॅबिनेट विस्तारात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचेच काही केंद्रातील मंत्र्यांना यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,
हेही वाचा…“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले