जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये यावं. त्यांच्यासारख्या लीडरशीपची सध्या भाजपला गरज आहे. असं म्हणत भाजपचे नेते विनोदी तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याची मागणी केली. त्यावर एकनाथ खडसे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. असं म्हणत खडसेंनी तावडेंना टोला हाणला.
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं. पण नुसतं येतांना नाथाभाऊ ज्या स्पष्टेपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी- जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत.असं विनोद तावडे यांनी सांगितलं.
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
दरम्यान, विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय. कर्नाटकच्या पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे, मात्र ज्या पक्षासाठी इतके केले. २०१४ पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधान परिषदचं सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. असं एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका