रायगड : आज संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापुरसह संपुर्ण राज्यात शिवप्रेमी राज्याभिषेक सोहळा साजरा करतांना दिसत आहेत. यातच आज रायगडावर शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने माजी खासदार संभाजी राजे यांनी शिवभक्तांना गडावरून खाली येऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा…“कारल्याला काही कारलं येत नाही अन् सूनबाई काही माहेरी जात नाही”, बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी
रायगडावर काल रात्रीपासून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रायगडावर जवळपास अडीच ते दोन लाख लोकं जमली. त्यातही गडाच्या पायथ्याशी अल्लोड गर्दी बघायला मिळत आहे. यावरून संभाजी राजे यांनी शिवभक्तांना गडाच्या पायथ्याशी येऊन गडावरील लोकं जोपर्यंत खाली उतरत नाही. तोपर्यंत खालून गडावर चढू नये असं आवाहन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे.
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला
दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास ५०-७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये. जिल्हा व पोलीस प्रशासन सोबत बैठक झालेली आहे. सध्या गडावर असलेले लोक ९ – १० च्या दरम्यान गड उतरतील, तेव्हा शिस्तबद्ध रितीने खाली असलेल्या लोकाना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो, असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
दुर्गराज रायगड वर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास ५० – ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये. जिल्हा व पोलीस प्रशासन सोबत बैठक झालेली आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,