मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात खोक्यांचा विषय चांगलाच चर्चेत आला. एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकार कोसळविण्यासाठी भाजपकडून ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर संपुर्ण राज्यात पन्नास खोके, एकदम ओक्केची घोषणा प्रचलित झाली. यातच आता खासदार कृपाल तुमने आणि अजित पवार यांच्यात खोक्यांवरून वार-पलटवार झाला आहे.
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असतांना किती खोके घेतले आहेत? खोक्के घेतल्याशिवाय अजित पवार काम करीत नव्हते. असं म्हणत त्यांना झोपतांना, जेवतांना फक्त खोक्के दिसत होते. असं शिवसेनेचे खासदार कृपाल तुमने यांनी अजित पवारांवर टिका करतांना सांगितलं आहे. त्यावर अजित पवारांनी देखील पलटवार केला आहे.
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?
राज्यातील एक जरी माणसांनी सांगितलं की मी खोके घेतले असं तर राजकारण सोडून देईन. परंतु आरोप जर सिद्ध झाले नाही तर त्यांनी घरं बसावं. राज्यातील सर्व आमदारांना माझ्या कामाची पद्धत जरी विचारली तरी ते सांगतील. असे बिनबुडाचे आरोप मी सहन करून घेणार नाही. असंही अजित पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार
हेही वाचा…शरद पवारांची ‘गुगली’ : विलास लांडेंचे ‘रि-लाँचिंग’ अन् डॉ. अमोल कोल्हे ‘क्लिनबोल्ड’
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन