पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेस सुरू आहे. या जागेवर दोन्ही बाजूने दावा सांगितला जात आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कामाला लागली असून कार्यकर्त्यांना तशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. काल पुण्यात लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?
काॅंग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणे ठाळले असले, तरी अप्रत्यक्षपणे मात्र या मतदारसंघात तयारीला सुरूवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांवर हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा…केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
पुणे लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माझ्यावर पुणे लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघात बुथनिहाय बैठका घेतल्या जाणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असेल हे शरद पवार आणि अजित पवार ठरवणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची ‘गुगली’ : विलास लांडेंचे ‘रि-लाँचिंग’ अन् डॉ. अमोल कोल्हे ‘क्लिनबोल्ड’
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका