मुंबई : मागील काळात अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावर उद्योग मंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका काढणार होते. राज्याील उद्योग परराज्यात गेल्याने महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी वा मागील दहा वर्षाच्या परकीय गुंतवणुकीचा रेकॉर्ड समोर आणावा असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उदय सामंत यांना दिलं आहे. या सरकारविषयी कोणीही फार समाधानाने बोलताना दिसत नाही. त्यामुळे निर्णय वेगवान, सरकार गतिमान कसे हे त्यांनी स्पष्ठ करावे. अशी खरमरीत टिकाही अजित पवारांनी केली.
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अजितदादा म्हणाले की, राज्यातील ४८ जागांसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष चाचपणी करत आहेत. हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. येत्या काळात कसबा आणि चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका लागल्यावर तीनही पक्षांमध्ये चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन
राज्यकर्त्यांकडून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी पाहायला मिळत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. याच्या जाहिरातींमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. या जाहिरातबाजीमध्ये शासनाने न घेतलेले निर्णय दाखवून राज्यातील जनतेची फसवणूक करण्याचा उद्योग राज्यकर्त्यांकडून सुरु आहे, योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जाईल, असे सांगून जाहिरातबाजीसाठी गर्दी जमवली जाते, असा थेट आरोप अजित पवारांनी केला.
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
दरम्यान, वन विभागातील बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, या खात्याचे प्रमुख परदेशात गेले आहेत. हे प्रमुख परदेशात जाणे आणि या विभागाच्या बातम्या येणे हा संशोधनाचा भाग असल्याचे अजित पवार म्हणाले. लाखो रुपये देऊन पदावर आलेले अधिकारी प्रामाणिकपणे कसे काम करू शकतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता जोवर बदलत नाही, तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही, असे ते मत त्यांनी व्यक्त केले.
READ ALSO :
हेही वाचा…भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…
हेही वाचा…खोक्यांवरून कृपाल तुमने अन् अजित पवारांमध्ये वार-पलटवार, अजित पवार म्हणाले, “तर राजकारण सोडून देईन”
हेही वाचा…पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार
हेही वाचा…शरद पवारांची ‘गुगली’ : विलास लांडेंचे ‘रि-लाँचिंग’ अन् डॉ. अमोल कोल्हे ‘क्लिनबोल्ड’
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”