मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी आल्याने राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसीय सुट्टीवर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक हिंसक घटना होत असतांना विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबाबत ट्विट केले आहे.
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी
शरद पवार यांना ट्विटवरून आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वत: बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपुर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्याच सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सूरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल. असं शिंदेंनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. @PawarSpeaks हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध