मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी आल्याने राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसीय सुट्टीवर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक हिंसक घटना होत असतांना विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “तुमचाही दाभोळकर होणार”, शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याचं नाव आलं समोर
गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटूंब गुरूवारी जम्मू-काश्मिरमध्ये दाखल झाले. तेथून विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने जम्मूतून सीधे पंछी हेलिपॅट येथे ३ वाजता पोहचले. येथे त्यांनी वैष्णो देवी मंदिर समितीचे अधिकारी नवनीत सिंह, अजय सलान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ३.४५ वाजता ते वैष्णो देवीच्या मंदिरात पोहाचले.
हेही वाचा…Breaking: राजकारणात खळबळ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब वैष्णव देवीचं दर्शन घेतलं. वैष्णो देवी मंदिर समितीने पवित्र चुनरी भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. सायंकाळी ५.३० वाजता वैष्णो देवी भवन येथून हेलिपॅडवर पोहचत विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने जम्मूला रवाना झाले. यासंदर्भात अमर उजाला ने वृत्त दिलं आहे. दरम्यान, शिंदे देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करमार असल्याचं सांगितलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी