मुंबई : राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं दुषित झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधातील नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते आणि आमदार निलेश राणे यांनी टिका केली. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
निवडणुक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. त्यावर आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ, दुसरा चीन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस. तुला भाजप ने तुकडा टाकलाय तो यासाठीच असं म्हणत सरडा असा हॅसटॅगही वापरला आहे.
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. तुमचाही दाभोळकर करू असं म्हणत सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटवर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस!
तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा pic.twitter.com/JwXDdRIH4M— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तुमचा दाभोळकर करू”, जीवे ठार धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “याची जबाबदारी ..”
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार