मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. तुमचाही दाभोळकर करू असं म्हणत सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटवर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावर आता शरद पवार यांच पहिली प्रतिक्रिया आली आहे.
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असं वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र प्रशासनावर आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तृत्वावर माझा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत. त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध
अलिकडेच शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा नामोउल्लेख औरंगाबाद केल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. याच संदर्भात मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय नेते शरद पवारांवर निशाणा साधत आहेत. यातच आता सौरभ पिंपळकर या ट्विवटर हॅंडलवरून ही धमकी आली आहे. तुमचा देखील दाभोळकर होणार, असं म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. तसेच राजकारण महाराष्ट्राचं या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा…राज्यात काय चाललंय? “तर बंदूकीने गोळ्या घालू ,” शरद पवारांना पाठोपाठ राऊतांनीही जीवे ठार मारण्याची धमकी
शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुखवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास व्हायला हवा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवालही अजित पवारांनी कले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक