मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपचा हस्तक्षेप, कल्याणमध्ये पुत्र श्रीकांत शिंदेंना भाजपमधून तीव्र विरोध या कारणांमुळे मुख्यमंत्री शिंदे भाजपवर नाराज असल्याची माहिती विश्वानीय सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
बुधवारपासून एकनाथ शिंदे रात्रीपासून ते अज्ञातवासात गेले, ते परराज्यात गेल्याचे सांगितले जात असले तरी दिव्य मराठी या दैनिकाच्या सुत्रांनुसार मुंबईतच आहेत. शनिवारपर्यंत ते कुणालाही भेटणार नाहीत. तसेच ते खासगी व धार्मिक कामात व्यग्र असल्याचे सांगितले जाते आहे.
हेही वाचा…“शरद पवारांची काळजी घेतली जाईल, आवश्यकता असल्याच….”, धमकी प्रकरणानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी आशा दोन्ही गटांतील इच्छुक आमदारांना होती, तसे दावेही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार केले, पण खांदेपालटात समाधानकारक काम न केलेल्या शिंदेसेनेच्या ५ मंत्र्यांना नारळ देऊन त्या जागी नवीन मंत्री नेमा, असे आदेश भाजपच्या हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, संजय राठोड, तानाजी सावंत यांचा समावेश आहे.
हेही वाचा…राज्यात धमकीचे प्रकरण….! मुख्यमंत्री देवदर्शनाला जम्मूत, विरोधकांची जोरदार टिका
बंडात साथ देणाऱ्यांना हटवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल? याचा अहवाल यंत्रणेने हायककमांडला दिला आहे. त्यात शिवसेनेचे ५ मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले आहेत. बंडात साथ देणाऱ्या या मंत्र्यांना काढावे कसे हे मुख्यमंत्र्यांसमोर आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं