पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघासाठी खासदार अमोल कोल्हे यांना परत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी कामाला सुरूवात करत निवडणुकीच्या तोंडावर पहिलाच यॉकर टाकला आहे. हडपसर लगतच्या गावांना घेऊन नवी महापालिका व्हावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
शिरूर लोकसभा मतदारसंघावरून माजी आमदार विलास लांडे आणि अमोल कोल्हे यांच्यात चुरस बघायला मिळत होती. परंतु पुण्यातील आढावा बैठकीत विलास लांडे यांच्यासमोरच शरद पवारांनी कोल्हेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार आता अमोल कोल्हे पुन्हा आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. यातच त्यांनी आता शिरूर मतदारसंघातील हडपसर विधानसभा भागातील काही गावांना घेऊन नवीन महानगरपालिका व्हावी, असं म्हटलं आहे. मात्र विरोधकांकडून वेगळी भूमिका घेतली गेली आहे.
हेही वाचा…“राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतोय हे जगजाहीर”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पुणे जिल्ह्यात हडपसर नवी पालिका बनवा अशी चर्चा आहे. मात्र चर्चा करतात, पंरतु पुढे काहीच होत नाही. मात्र आता अमोल कोल्हे यांनी ही मागणी रेटली आहे. ५० वर्षात हडपसर भागाचा विकास ज्या गतीने होणे अपेक्षित होतं. तो न झाल्याने जनमानसात आम्हाला नवी महानगरपालिका व्हावी, अशी भावना आहे. ह्या भावनेचा आदर करत असतांना काही तज्ञ व्यक्तींचा समावेश करून विचार करणे अपेक्षित असल्याचं माजी आमदार योगेश टिळेकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली