दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही काळापासून पक्षांमध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या प्रकाशन वेळी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. मात्र आज पक्षाच्या वर्धापन दिली त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! अपघात की घातपात? ठाकरे गटाच्या खासदारावर डम्पर घालण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापुर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे. ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल शरद पवार, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे मनापासून आभार असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून दोघांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमा वेळी पवारांनी याची घोषणा केली.
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्यातील निवडणुकांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. आजवर अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारण सांभाळतील, असं बोललं जात होतं. मात्र सुप्रिया सुळे यांना आता राज्यातील प्रमुख जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आल आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“तर मी खासदारकीचा राजीनामा देईन,” कल्याणमधील भाजप-शिंदे वाद विकोपाला, श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायच्या तयारीत
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?