मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच शिंदे-फडणवीस सरकाराच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केला जात होता. परंतु खांदेपालटात समाधानकारख काम न केलेल्या शिंदे सेनेच्या ५ मंत्र्यांना नारळ देऊन त्या जागी नवीन मंत्री नेमा, असे आदेश आता भाजपच्या हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे.
हेही वाचा…“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली
बंडात साथ देणाऱ्यांना हटवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल.? याचा अहवाल यंत्रणेने हायकमांडला दिला आहे. त्यात शिवसेनेचे ५ मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले आहेत. बंडात साथ देणाऱ्या या मंत्र्यांना काढावे कसे हे मुख्यमंत्र्यांसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.
हेही वाचा…“तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला?” राष्ट्रवादीने राणेंना डिवचलं
१. गुलाबराव पाटील : अपेक्षित कामे नाहीत ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण मतदारांत सरकारविषयी नाराजी. शिंदेंना का हवे?- उद्धवसेनेकडून होणाऱ्या हल्ल्यांना आक्रमक उत्तर देणारे आणि उत्तर महाराष्ट्रात ताकदवान.
२. तानाजी सावंत : प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ नेमले. सार्वजनिक आरोग्य सुधारणेत कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात व्यवहारासाठी स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले. शिंदेंना का हवे?- प. महाराष्ट्रात मोठे प्रस्थ, ठाकरेंना तीव्र विरोध
३. संजय राठोड : औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी. भाजप समर्थक असलेल्या औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी. तसेच एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने समाजात प्रतिमा मलिन. शिंदेंना का हवे?- विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाची मते मिळवण्यात उपयोगी ठरतील.
४. अब्दुल सत्तार : कृषी योजनांचा लाभ नाही. केंद्राच्या योजनांचा लाभ कृषिमंत्री सत्तार खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज आहेत. शिंदेंना का हवे? – एकमेव मुस्लिम मंत्री. वेळोवेळी अनेक ‘अर्था’ने मदत करतात आणि स्वबळावर विजयाची क्षमता.
५. संदिपान भुमरे : बदल्यांमध्ये गुंतले. रोहयो, फलोत्पादन योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या नाहीत. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप. शिंदेंना का हवे?- बंडासाठी सर्वात अग्रेसर. बंडखोरांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका होती आणि मराठा चेहरा.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून आता महायुतीत देखील विविध गोष्टींमुळे वाद उफाळून आला आहे. शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजप घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याचंही सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! अपघात की घातपात? ठाकरे गटाच्या खासदारावर डम्पर घालण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात