ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे-फडणवीस यांच्या युतीत पहिली ठिणगी पडली आहे. आता हा वाद विकोपाला गेला असून कल्याण मतदारसंघात भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी थेट राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलिस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही.तोपर्यंत शिवसेना शिंदे गट कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी एक बैठक बोलवून यावर विचारविनिमय करण्यात आला.
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
दरम्यान, मला कुठलाच स्वार्थ नाही, मला जर उद्या कोणी सांगितलं की कल्याण लोकसभेचा राजीनामा दे, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पुर्णपणे पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. मला उद्या पक्षनेतृत्व किंवा तुम्ही सांगितलं की तुम्हाला कल्याण लोकसभेसाठी चांगला उमेदवार मिळत आहे, तर तुमच्याप्रमाणेच मीही त्याला निवडून आणण्यासाठी काम करेन, आमचा उद्देश हाच आहे की, २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत. असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
हेही वाचा…मोठी बातमी..! अपघात की घातपात? ठाकरे गटाच्या खासदारावर डम्पर घालण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?