मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ज्या ट्विट खात्यावरून ही धमकी देण्यात आली, त्या सौरभ पिंपळकर याच्या बायोमध्ये भाजपचा कार्यकर्ता असं म्हटलं आहे. तसेच याचे फोटो भाजपच्या अनेक नेत्यांसोबत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच पाश्वभूमीवर सौरभ पिंपळकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
हेही वाचा…“तर मी खासदारकीचा राजीनामा देईन,” कल्याणमधील भाजप-शिंदे वाद विकोपाला, श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायच्या तयारीत
तुमचाही दाभोळकर करू असं म्हणत सौरभ पिंपळकर याने ट्विटवरून शरद पवारांना धमकी दिली. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झाली. तर सौरभ पिंपळकरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. तर आमदार रोहित पवार यांनी त्याच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं आहे.
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणारा सौरभ पिंपळकर याने ट्विट बायोमध्ये लिहिलेलं आय अॅम बीजेपी अॅक्टिव्हिस्ट हे पाहता आणि त्याचे भाजपच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांसोबतचे व्हायरल फोटो पाहता भाजपला जबाबदारी झटकता येणार नाही. शिवाय त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर आय हेट सेक्युलॅरिझम असं लिहिलंय. हे सरळ सरळ संविधानाला दिलेलं आव्हान आहे. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा भाजपचं संविधानविषयीचं प्रेम बेगडी असल्याचं सिद्ध होणार आहे. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणारा सौरभ पिंपळकर याने ट्विटर बायोमध्ये लिहिलेलं ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्ट’ हे पाहता आणि त्याचे भाजपच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांसोबतचे व्हायरल झालेले फोटो पाहता भाजपाला जबाबदारी झटकता येणार नाही… शिवाय त्याने त्याच्या ट्विटर… pic.twitter.com/LZl1rQkAp7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी