छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीत औरंगाजेबाचे फोटो दाखवले असता मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर कोल्हापुर आणि छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू महासभेने मोर्चा काढला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकडून टिका केली आहे. यावरून आता पुन्हा एकदा ट्विटवार रंगला आहे.
हेही वाचा…पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवारांचे धक्कातंत्र! अजित पवारांचा हात मोकळा, मात्र सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी
बाटतीलून भूत बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जूनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करण्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वत:चा मेंदू वापरन हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे पार्टी विथ डिफ्रन्स जाणीवपुर्वक नजरेआड करते. असा दावनेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“तर मी खासदारकीचा राजीनामा देईन,” कल्याणमधील भाजप-शिंदे वाद विकोपाला, श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायच्या तयारीत
मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे.स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा. असं आवाहनही दानवेंनी भाजपला दिलं आहे.
हेही वाचा…वादळी वाऱ्याने भाजपच्या कार्यक्रमातील मंडप कोसळला, नेत्यांची फजिती, लोकांचा गोंधळ, नितेश राणेंसह…
आमच्या ट्विटमध्ये आम्ही औरग्याचा उल्लेखही केला नसताना तुम्हीच त्या क्रुरकर्म्याचे नाव घेऊन बाटलीतून भूत काढत आहात. त्याएवजी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर शरद पवार यांचा विनाकारण फोटो लावून केलेल्या तुलनेचा निषेध नोंदवला असता तर बरे झाले असते. असं भाजपने म्हटलं आहे. तर त्यावर आता अंबादास दानवे यांच्याकडून उत्तर देण्यात आला आहे. मग मोदी आणि थोरल्या छत्रपतींची अशी तुलना चालते का? साधी मागणी आहे माझी, लिहा एक पत्र तुमच्या दिल्लीच्या पातशाहांना. काढा म्हणा संरक्षित स्मराकाचा दर्जा असं म्हणत दानवेंनी भाजपला डिवचलं आहे.
@BJP4Mumbai
मग #मोदी आणि थोरल्या छत्रपतींची अशी तुलना चालते का?साधी मागणी आहे माझी, लिहा एक पत्र तुमच्या दिल्लीच्या पातशाहांना. काढा म्हणा ‘संरक्षित स्मारकाचा दर्जा’….. https://t.co/xOZnD4K1d9 pic.twitter.com/1Y0CxTHE9N
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया