अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले, त्यामुळे आता एसटी संपाच्या समस्येवर एक आशेचा किरण दिसू लागला आहे, आता लवकरच एसटीच्या संपावर तोडगा निघेल, आता लवकरच चांगला संदेश मिळेल, अशी आशा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले असल्याची टीकाही राणा यांनी केली आहे.
‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची गुप्त बैठक झाली. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली, तर या भेटीवरून त्यांनी तीन पक्षाचे सरकार कोण चालवले हे स्पष्ट झाले असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याची भूमिकाही एसटी कामगारांनी घेतली आहे. दिवसेंदिवस हा संप अधिकच चिघळत चालला आहे. या चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अनिल परब यांनी माध्यामांना माहिती दिली. ” एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि भत्ते याबाबत कोणत्या उपययोजना करता येतील, एसटी संप मिटवण्यासंदर्भात कोणते पर्याय आहेत, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंबंधीच्या उपाययोजना, सटी संप मिटवण्याबाबत एसटीची आर्थिक परिस्थिती भविष्यातील उपाययोजना, मागण्या यावर चर्चा झाली. तसेच बाकीच्या राज्याचे पगार आपल्या राज्याचे पगार इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
Read Also :
- शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर एसटी संपावर अनिल परब यांचं मोठं विधान
- विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने विदर्भात मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम..!
- कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
- ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक