नागपूर : श्रीक्षेत्र शनि शिंगणापुर संस्थात मागील काही वर्षापासून कोट्यवधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. संस्थात काही राजकीय हस्तक्षेप होत असून त्यांच्याकडूनच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. याची चौकशी व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी उपोषण सुरू केले. परंतु या प्रकरणाची चौकशी होईल, याचं आश्वासन देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन ; आतापर्यंत सरकारने काय काम केलं ?
शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये ६५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना १८०० कर्मचारी हे देवस्थानमध्ये काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ६५ कर्मचाऱ्यांपैकी देखील केवळ १२ कर्मचारीच हे कामावर येत असून बाकीच्यांना घरबसल्या पगार मिळत असल्याचा मुद्दा बावनकुळे यांनी मांडला. सोबतच शनिशिंगणापुर येथील चौथऱ्यावर जाण्यासाठीची पाचशे रूपयांची पावती ही संस्थामध्ये न बसवता ती बाहेरच बनवली गेली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आणि ती पावतीच्या माध्यमातून दोन कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित देणगी ही शैनेश्वर नावाच्या खासगी शाळेच्या नावावरती वसूल केली असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलं.
हेही वाचा…मोदी हटावचा नारा, जागावाटपाबाबत चर्चा ; इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक
सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून श्रीक्षेत्र शनि शिंगणापुर संस्थाचं ऑडिट केलं जाईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संस्थाच्या सर्व व्यवहारांचे ऑडीट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्याचेही आश्वाशन दिले. तसेच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करण्यात येईल आणि २ महिन्यात अहवाल घेण्यात येईल. असंही फडणवीसांनी म्हटलंय. त्यानंतर ऋषिकेश शेटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
हेही वाचा…१४१ खासदारांचं निलंबन ;सुळे आणि कोल्हेंचं निलंबन, अनिल देशमुखांची केंद्र सरकारवर जहरी टिका
दरम्यान, जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता. श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट करण्यात येईल. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करण्यात येईल आणि 2 महिन्यात अहवाल घेण्यात येईल. यापूर्वी सहायक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशी अहवालात विसंगती आहेत. त्यामुळे ही चौकशी आवश्यक आहे. असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तर श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर येथे विश्वस्त मंडळाच्या आशीर्वादाने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. येथे अनधिकृत कामगार भरती झाली असून चौथाऱ्यावर दर्शनासाठी बनावट पावती छापून कोट्यवधी रुपये उकळले आहेत, याविषयी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना माडून माहिती दिली. श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे दाखले देत या प्रकरणाची तपास यंत्रणांद्वारे सखोल चौकशी करण्याची, देवस्थानच्या मागील दहा वर्षांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याची व श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. लक्षवेधीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. अस बावनकुळे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“बाळासाहेबांना विचारलं तर कमरेत लाथ बसेल”, भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान, दानवेंनी घेतला समाचार
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारीपर्यंत लांबला ; विशेष अधिवेशन होणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…“तर 2024 ला मी मुख्यमंत्री होऊ शकतो”, बच्चू कडूंच्या दाव्याने अनेकांची उडाली भंबेरी
हेही वाचा…मराठा आरक्षणाच्या विषयासाठी एकूण ३० बैठका ; मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती