मुंबई : राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत सत्तेत राहणार नसल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला. राज्यात तब्बल 10 दिवस प्रंचड राजकीय संघर्ष शिवसेनेत आणि एकनाथ शिंदे यांच्यात बघायला मिळाला. शिवसेनेचे 56 आमदारांपैकी एकनाथ शिंदे यांच्या गटात 40 आमदार सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता राहिलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात राहण्याचं आवाहन आता सेनेकडून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपवर टिका केली आहे.
“विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांचा विरोधात आम्हाला बोलण्यात आनंदही नाही. मात्र वाचाळविरांना माफी मिळणार नाही. असं इशारा देखील दिपाली सय्यद यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर देखील निशाणा साधला आहे.
“काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
एकनाथ शिंदे साहेब आदरणीय आहेत पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि दोन भाजपचे अन्य दोन वाचाळविर उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टिका करतील. तर त्यांना एवढच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरोधात आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण जवळपास ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर १८ खासदारांपैकी १२ खासदार देखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.
@BJP4Maharashtra
@ShivSena
@CMOMaharashtra pic.twitter.com/P4kCccD9gr— Deepali Sayed (@deepalisayed) July 6, 2022
Read also
- “कारण रिक्षाला बुलडोझरनेच ओढलं जातंय”; ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
- “अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
- “ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
- “देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट