मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोचं खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडून खंडन करण्यात आलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट करत त्यांच्यासोबत कोणतीही भेट न झाल्याचं म्हटलं आहे. तसेच तो फोटो जुना असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे सिल्वर ओकवर गेले. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही ते म्हणाले आहे.
“कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”
एकनाथ शिंदे यांनी व्हायरल झालेला फोटो हा जुना असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हा फोटो 2021 मधील असल्याचं म्हटलं आहे. भाजप आणि शिंदे सरकार थोड्या दिवसापुरताचं आहे. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकतं, असं वक्तव्य शरद पवारांनी अलिकडेेच केलं होतं. त्यामुळे या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती.
तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला
दरम्यान, शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. मात्र अशातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काल सांगोल्यात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्यासोबत 18 खासदारांपैकी 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतीच्या निव़डणुकीत भाजपप्रणित पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये…..#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
Read also
- “ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
- “देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
- “विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
- “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”