मुंबई : सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील जवळपास 15 दिवसानंतर आपल्या मतदार संघात पोहचले. त्यावेळी त्यांना उचलून घेत त्यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार घणाघात केला. तसेच संजय राऊतांचा त्यांनी शिवसेनेचा नारद मुनी असा उल्लेख देखील त्यांनी केला आहे.
“कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”
संजय राऊतांनी त्यांनी उद्देशून बोलताना ते म्हणाले की मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे. एक शिंगाट खाली घातलं तर तुला असा उभा करेन, आमच्या नादाला लागू नको, तसेच पेकाटात असा सिंगाट घालेन की पुन्हा तुला उभा राहता येणार नाही, असा इशाराही शहाजी पाटील यांनी राऊतांना दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शहाजी पाटिल यांच्या भाषण प्रंचड व्हायरल होत आहे.
तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला
संजय राऊतांचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे आणि ते कापुन काढू, प्रेतं आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सांयकाळी चपाती खाऊन झोपतो. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो, त्यानंतर अंगात रग येते मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते त्यांनीच बोलावं असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे म्हणून संजय राऊतांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं. तरच उरलं सुरलं ठाकरे घराणं राहीन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे. असंही ते म्हणाले.
बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड
दरम्यान, शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे जवळपास 40 आमदास आहेत. मात्र अशातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काल सांगोल्यात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्यासोबत 18 खासदारांपैकी 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतीच्या निव़डणुकीत भाजपप्रणित पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
Read also
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
- “देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
- “विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
- “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
- “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर