मुंबई : शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे जवळपास 40 आमदास आहेत. मात्र अशातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काल सांगोल्यात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्यासोबत 18 खासदारांपैकी 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतीच्या निव़डणुकीत भाजपप्रणित पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला
१८ जुलै, २०१२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. हया पदासाठी यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. द्रौपदी मुर्मू ह्या आदिवाशी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. द्रौपदी मुर्मू या राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरूवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे. असंही त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्याकारणाने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच प्रणव मुखर्जी यांना देखील वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता. द्रौपदी मुर्मू ह्यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत. अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. शिंदे गटात आता खासदार, नगरसेवक, महापौर, आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आता जोरदार बैठक सत्रं सुरू केल्या आहेत.
आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती #द्रौपदी_मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी माझ्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.@murmuu_draupadi @OfficeofUT pic.twitter.com/wBEY0VQLVB
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) July 5, 2022
Read also
- “देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
- “विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
- “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
- “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- “कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”