मुंबई : शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे 40 आमदार सोबत असल्याची माहिती समोर आहे. त्याचबरोबर आता 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणुक होत असून त्यासाठी मतदान होत आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे खासदार भाजपने दिलेल्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर! राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम
राष्ट्रपती पदासाठी आपण भाजपच्या उमेदवारांना मतदान करायला हवं, असं शिवसेनेचे खासदार सांगताना दिसत आहेत. त्याचबरोबर 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे, प्रेतं, घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
बंडखोर आमदारांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आम्ही जनतेतून निवडून आलेले आमदार आहोत. जनतेचे जिथे कल्याण आहे तो निर्णय मी घेतलेला आहे. असं म्हणत चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना पुरवण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. त्यांनी यासंदर्भात चंद्रपुर एसपी ऑफिसा पत्र देखील लिहिलं आहे.
शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?
दरम्यान, बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी देखील त्यांना देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली आहे. विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध झाल्यानंतर बंडखोर आमदार आपपल्या मतदार संघात परतले आहेत.
Read also
- “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
- “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला”; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- “कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंद”
- तर मातोश्रीची पुजा करून सर्वच आमदार निवडून आले असते; अपक्ष आमदारांचा टोला
- बापरे..! दोन मयत शिवसैनिकाची पदाधिकारी म्हणून निवड