मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. उर्वरित शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी 12 ते 13 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार आणि भाजप आमदारांमधून कुणाला लॉटरी लागणार त्याची उत्सुकता सगळ्यानांच लागून राहिली आहे.
“तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पद हा शिवसेनेला गेल्यानंतर शिंदे सरकारमध्ये भाजपकडे महत्वाची खाती म्हणजे गृह, आर्थिक खाती जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडे सार्वजनिक बांधकाम, नगरविकास खातं जाणार आहे. कारण उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदेकडेच ही दोन्ही खाती होती. त्यामुळे शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना ही खाती मिळणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस
भाजपकडून कॅबिनेट मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, मनिषा चौधरी, यांची नावं चर्चेत आहेत. तर राज्यमंत्री पदासाठी भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून दिपक केसरकर, बच्चू कडू, संजय शिरसाठ, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजी देखील असल्याची माहिती समोर आली होती.
“आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रूपयांचा निधी जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार केला आहे.
Read also
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं