मुंबई : शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. सेनेचे जवळपास 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. तर अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास दहा दिवस चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर बंडखोर आमदार आपल्या घरी पोहचले आहेत. यातच एकनाथ शिंदे यांनी काल तीन महत्वाच्या घोषणा केल्या. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
“आज सर्वच पक्षातील व अपक्ष आमदार इडी शाहीला टरकलेले आहेत” हरी नरके
एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रूपयांचा निधी जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार केला आहे. यावर आता भाजप आमदार पराग शाह यांनी मागच्या सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज केल्या तीन महत्वाच्या घोषणा; तालिका अध्यक्षांची देखील जाहीर केलीत नावे
वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपुष्टात येऊन आता भाजपा-शिवसेना युती सरकार आल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा करत सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारा स्तुत्य निर्णय घेतला आहे. असं पराग शाह यांनी म्हटलं आहे.
“शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी भाजपने अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांना तुरूंगात जावं लागलं आहे. तर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर सध्या इ़डीचा ससेमिरा पाठीमागे आहे.
Read also
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका
- “तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- त्यामुळेच आदित्य ठाकरेंना अपात्रतेची नोटीस पाठवली नाही; सेनेच्या 14 आमदारांना नोटीस