मुंबई : सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दमदार भाषण केले. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य़, बंडखोरीमागील कारणं, शिवसेनेत असताना केलेली कामं, तसेच अनेक राजकीय किस्से सांगत सभागृह दणाणून सोडलं. तसेच शिंदे सरकार या राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे हिताची काम करतील अशी असं आवाहन देखील त्यांनी जनतेला दिलं आहे. तसेच त्यांनी यावेळी तिन महत्वाच्या देखील घोषणा केल्या आहेत.
अजित पवारांची खुर्ची आता फडणवीसांना अन् फडणवीसांची खुर्ची अजित पवारांना
एकनाथ शिंदे यांनी आज रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रूपयांचा निधी जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा निर्धार केला आहे.
“लक्षात ठेवा..! भुजबळ, राणे साहेबांनी शिवसेना फोडल्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही”
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आज बहुमत चाचणी जिंकली आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला 164 तर महाविकास आघाडीला 99 मत मिळाली आहेत. तसेच यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनच्या कामकाजासाठई विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची विधानसभेत घोषणा केली. यामध्ये योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे, संजय शिरसाठ यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
“मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दमदार भाषण केलं. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य़, बंडखोरीमागील कारणं, शिवसेनेत असताना केलेली कामं, तसेच अनेक राजकीय किस्से सांगत सभागृह दणाणून सोडलं. तसेच शिंदे सरकार या राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे हिताची काम करतील अशी असं आवाहन देखील त्यांनी जनतेला दिलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण पाहिल्या तर लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार नगरसेवक हे विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण आज मंत्री सत्तेकडून विरोधी पक्षाकडे गेले. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतलेली आहे. माझ्यासोबत गेले १५ दिवस शिवसेनेचे जे ४० आणि सहयोगी पक्षाचे ११ असे आमदार आहेत. त्यांनी माझ्यासोबत विश्वास ठेवला आणि मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिंदे साहेबांची बुलेट ट्रेन काही थांबली नाही”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फटकेबाजी
- ..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
- “एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
- “बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
- “ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात”; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात