मुंबई : सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दमदार भाषण केले. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य़, बंडखोरीमागील कारणं, शिवसेनेत असताना केलेली कामं, तसेच अनेक राजकीय किस्से सांगत सभागृह दणाणून सोडलं. तसेच शिंदे सरकार या राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे हिताची काम करतील अशी असं आवाहन देखील त्यांनी जनतेला दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना खोचक टोला लगावला.
“लक्षात ठेवा..! भुजबळ, राणे साहेबांनी शिवसेना फोडल्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही”
सभागृहात एकनाथ शिंदे साहेबांचं सभागृहातील भाषण म्हणजे बुलेट ट्रेन सारखं होतं. एकदा सुरू झाले ते पुन्हा सुसाट सुटले. त्यांची फडणवीस आणि केसरकरांना काळजी वाटायला लागली. हे सर्व मी बघत होतो. पण माणसाला कुठेतरी मन मोकळं करावं वाटतं. त्यांनी त्यांचं काम करावं आपण आपलं काम करावं, अशा पद्धतीने लोकशाही जपवण्याचं काम व्हावं. जर जनतेने ठरवलं तर अनेक बलाढ्या नेत्यांनाही सत्तेतून बाहेर बसवतात. असंही ते म्हणाले.
“मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
महाराष्ट्राच्या विधानमंडळाला एक गौरवशाली पंरपरा आहे, सर्वांची नावं घेणार नाही, परंतु विरोधी पक्षाच्या खुर्चीवर अनेक नेत्यांना बसताना पाहिलं आहे. गेल्या काही दिवसात अधिवेशन झाली नाहीत . नागपुरलाही अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा. असंही अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी मागील काही काळातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचा देखील उल्लेख याठिकाणी केला.
एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दमदार भाषण केलं. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य़, बंडखोरीमागील कारणं, शिवसेनेत असताना केलेली कामं, तसेच अनेक राजकीय किस्से सांगत सभागृह दणाणून सोडलं. तसेच शिंदे सरकार या राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे हिताची काम करतील अशी असं आवाहन देखील त्यांनी जनतेला दिलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण पाहिल्या तर लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार नगरसेवक हे विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण आज मंत्री सत्तेकडून विरोधी पक्षाकडे गेले. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतलेली आहे. माझ्यासोबत गेले १५ दिवस शिवसेनेचे जे ४० आणि सहयोगी पक्षाचे ११ असे आमदार आहेत. त्यांनी माझ्यासोबत विश्वास ठेवला आणि मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also
- ..तर मी जगाचा निरोप घेईल; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द ! वाचा सविस्तर भाषण
- “एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
- “बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
- “ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात”; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात
- अजित पवारांची खुर्ची आता फडणवीसांना अन् फडणवीसांची खुर्ची अजित पवारांना